विनया प्रफुल पुंडे या गेली दोन दशकाहून अधिक काळ स्वास्थ्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
स्वास्थ्य जागृतीसाठी योग व निसर्गोपचार प्रशिक्षण व त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा कोर्स त्या चालवतात. प्रत्येक कुटुंबासाठी एक स्वास्थ्य रक्षक देण्याचे ध्येय व कुटुंबातील कोणीही व्याधिग्रस्त असू नये, म्हणून निवासी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. ज्यामधून असंख्य लोकांना मधुमेह, बीपी इत्यादी विकारमुक्त आयुष्याचा लाभ झाला आहे.
कोरोना काळानंतर विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी सुद्धा ‘Immunity Weekend’ असे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी-रविवारी शिबिराचे आयोजन करतात.
जनजागृतीसाठी असंख्य व्याख्याने व ‘Good Bye Doctor’ हा एक सप्ताहाचा कोर्स त्या अनेक ठिकाणी जाऊन घेतात.
त्यांच्या या स्वास्थ्य कार्याला समग्रतेचा व अध्यात्मिक स्पर्श आणि त्यांचे प्रेमळ विचारी व्यक्तिमत्व
वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत आहे. तसेच स्वास्थ्य, शिक्षण व संस्कृती या त्रिसूत्रीवर त्यांची ‘दुवा’ संस्था कार्यरत आहे.


दुवा संस्थेतर्फे पर्यावरण रक्षणाचे सुंदर उदाहरण म्हणून ओसाड टेकडीचे ‘ग्रीन हिल’ मध्ये रूपांतरण झाले आहे.
तेथे निसर्गरम्य पवित्र वातावरणामध्ये आरोग्य शिबीरे घेतली जातात.
योग निसर्गोपचाराचे ग्रीन हिल हे स्वास्थ्य देणारे केंद्र आहे.
सुविधापूर्ण निवास व्यवस्था व पवित्र वातावरण हे ग्रीनहिलचे वैशिष्ट्य आहे.
अनेकजण कौटुंबिक स्नेहसंमेलन, नवोदित कलाकारांसाठी सांस्कृतिक उपक्रम, पिकनिक, सेमिनार, कार्यशाळा इत्यादीसाठी ग्रीनहिल ची निवड करतात.
स्वयंप्रेरणेने स्वस्थ भारत मिशनसाठी त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.