स्वयंप्रेरणेने ʻस्वस्थ भारत मिशनʼ साठी ग्रीनहिल गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे आणि आव्हानही आहे. एका उत्तम मिशनसाठी सुजाण नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तिने कार्यरत होऊ या राष्ट्रभक्तिचे उत्तम उदाहरण घालू या. सुदैवाने आपल्यासाठी तपश्र्चर्या करणारे पंतप्रधान लाभले आहेत. वेळेचे आणि आयुष्याचे सोनं करूया. खालील कोणत्या गोष्टींसाठी आपला सहभाग आहे ते कळवावे. हे केवळ सामाजिक कार्य नाही आपला वैयक्तिक लाभ ही आहे.

 • ʻस्वस्थ भारतʼसाठी ʻस्वच्छ भारतʼ अपेक्षित आहे. स्वच्छ भारतासाठी कचरा निर्मूलन व पर्यावरण रक्षण गरजेच आहे. सगळ्या गोष्टी सरकारने करणे असे सुजाण नागरिक अपेक्षा करीत नाही. आपण स्थानिक कार्य करू शकतो. अनेक योजना करता येतील. काहीजण करतही आहेत.
 • स्वस्थ भारतासाठी प्रत्येक कुटूंबात एक ʻस्वास्थ्य रक्षकʼ असायला हवा. ज्याला आहार-विहार, विकार, उपचार याचे ज्ञान हवे. त्यासाठी अगदी सोपा उपाय, १ वर्षाचा पार्टटाईम शासनमान्य योग निसर्गोपचार कोर्स, कर्वेनगर पुणे येथे. प्रवेश सुरू आहे. वयाची अट नाही. ज्येष्ठ नागरीक, १० वी पास, १२ वी नापास, तरूण पिढीसाठी व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध. मार्गदर्शन मिळेल. प्रशिक्षण मिळेल.
 • ʻस्वस्थ भारतʼ साठी प्रथम आपण निरोगी असायला हवे. आपल्याला आपल्या कुटूंबामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब,संधिवात, स्थूलता, पचनाचे, पाळीचे इत्यादी विकार असतील तर आपल्यासाठी प्रत्येक महिन्यात ५ दिवसांचे निवासी आरोग्य शिबीर आहे. ज्यामध्ये योग प्राणायाम थेरपी, पंचमहाभौतिक उपचार व आहार हेच औषध केले जाते. औषधाशिवाय व्याधिमुक्तीचा अनुभव घेता येतो.
 • आपण तरूण निरोगी असाल तर ते टिकवणे सध्याच्या जीवनशैलीमुळे कठीण होत चालले आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवार शरीर शुद्धीकरण शिबीर असते. स्वस्थ तरूण पिढीच स्वस्थ बालकांना जन्म देऊ शकते.
 • प्रत्येक २० किमीवर निसर्गोपचार केंद्र असावे हे स्वप्न आहे. स्वस्थ भारतासाठीची ती पायाभूत व्यवस्था आहे.
  आपल्याकडे जमीन, शेती असल्यास निसर्गोपचार केंद्र उघडण्यासाठी व ते चालवण्यासाठीची सर्व मदत, (आर्थिक सोडून) मार्गदर्शन देण्याची सोय आहे.
 • आपल्याला यापैकी काहीच शक्य नसेल तर आपल्या घरी येऊन आरोग्य योग मार्गदर्शन घेऊ शकता. फक्त यासाठी कमीतकमी १० व अधिक कितीही व्यक्ति असायला हव्या. एक आठवड्याचा ʻBe Your Own Doctorʼ कोर्स आहे. त्याची फी सर्वांना मिळून ५ दिवसांसाठी रु. १०,००० आहे. खास स्वास्थ जागृतीसाठी हा प्रयत्न आहे.
 • पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबाद तर्फे विनामूल्य परिवार, शिक्षण, संस्कृती मार्गदर्शन. प्रत्येक शेवटच्या रविवारी संध्या ५ ते ७. सर्व वयांसाठी आपले स्वागत.

योग निसर्गोपचार केंद्र मार्गदर्शन

देशभरामध्ये प्रत्येक २० किमीवर लोकांच्या स्वास्थासाठी वेलनेस सेंटर / योग निसर्गोपचार केंद्रे हवी.

योग, निसर्गोपचार, आयुर्वेद ही आपली भारतीय चिकित्सापद्धती आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चिकित्सापद्धती सुद्धा स्वदेशी हवी.

ही पद्धती अहिंसक, दुष्परिणामरहित, नैसर्गिक व सर्वांना परवडण्यासारखी आहे.

निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्ग हवाच. मोकळी जागा वृक्ष वेलींनी युक्त असल्यामुळे स्थानिक प्राणवायू पुरवठा व वातावरण शुद्धीसाठी सहाय्यक होईल. गोपालन व निसर्ग संवर्धन सहजच होईल. सेंद्रिय अन्नधान्याविषयी जागरूकता होईल.

नैसर्गिक जन्म व नैसर्गिक मृत्यू सहजच घडेल.

ज्यांच्याजवळ जागा व इच्छाशक्ती असेल त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळेल.

ग्रीन हिल

पुणे-सातारा महामार्गावर पुण्यापासून फक्त ४५ कि. मी. वर ग्रीन हिल एक निसर्गरम्य टेकडी आहे. टेकडीवर सुरेख, सुखसोयींनी सज्ज कॉटेजेस आहेत. सभोवताली कडुलिंब, आवळा, निरगुडी, इ. वृक्षराजींनी शुद्ध हवा व तुलसीवनात श्रीकृष्ण प्रत्यक्ष कृपा करण्यासाठी स्थित आहे. सेवेसाठी नम्र, प्रेमळ लोक आपल्याला माहेरपणाचा अनुभव देतात. स्वादिष्ट, नैसर्गिक, रुचकर, पोषक, सात्विक भोजनाची सोय आहे. प्रत्येक महिन्यात संस्कृति-जागृती, कला साहित्य, सण वार, स्वास्थ्य, शिक्षण,
कौशल्य इत्यादींवर खास कार्यक्रम आयोजित केले जातात. कौटुंबिक स्नेहसंमेलन, निवांत सुटी, सेमिनार, बैठका इत्यादीसाठी उपलब्धता. अत्यंत माफक दरात दिवसभराच्या सहली, वर्षासहलींसाठी उत्तम. जवळपास पर्यटनासाठी भोर, भाटघर धरण, भोर राजवाडा, वीर धरण, वाई,
शिवथरघळ, केतकावळे येथील बालाजी मंदिर इ. अनेक ठिकाणे आहेत. काही किल्ले व गडही आहेत.

निसर्गोपचार

निसर्गौपचार ही शारीरिक ,मानसिक, अध्यात्मिक,नैतिक ,सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धति आहे.

आरोग्य शिबीर (निवासी)

स्वस्थ भारतासाठी स्वस्थ कुटूंब हवे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति रोगमुक्त हवा. रोगमुक्ती कायमची व औषधांशिवाय हवी. त्यासाठी निसर्गसान्निध्य, तणावमुक्तता, योग्य पोषक व स्वादिष्ट आहार आणि पंचमहाभौतिक उपचार हवेत.हे सगळेच उपचार आरामदायी, निश्चित विकार मुक्ती करणारे, दुष्परिणाम रहित, अहिंसक आहेत.
तुमच्याकडून मात्र वेळ, सातत्य व माफक मूल्य खर्च करण्याची अपेक्षा आहे.
खूप वर्षांचा आजार फक्त ५-६ दिवसात बरा होणार नाही, पण बरे होण्याची प्रक्रिया नक्की सुरू होते. पुढे आपल्याला सातत्याने वर्षातून दोन तीन शिबीरे तरी करावी लागतील, पण रोगमुक्ती कायमची व औषधांशिवाय होईल याची खात्री बाळगावी. ही आरोग्य शिबीरे करून अनेकांनी आपली बीपी, डायबिटीस, संधिवात आदि व्याधिमुक्ती करून घेतली आहे.

रोग प्रतिकारक शिबीर

कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्तिचे महत्त्व जाणले.

रोगप्रतिकार शरीराने नैसर्गिकपणे करायला हवा.

बाह्य उपचाराने व्हॅक्सिन, गोळ्या, औषधे यांनी तत्कालिन होतो.

Harmony is Health.
Disharmony is Disease.

Harmony with Nature.

Let’s learn to live in harmony with Nature.

निसर्गाशी संतुलन = आरोग्य
निसर्गाशी असंतुलन = अनारोग्य

निसर्ग सान्निध्यात शनिवार, रविवार

शरीर शुद्धीकरण. Detoxification

रोगप्रतिकारक शक्तिची वाढ. Enhancing Immunity

पोषक आहार. Good Nutrition

आराम व तणावमुक्ती. Rest & Relaxation

योग निसर्गोपचार मार्गदर्शन

– देशभरामध्ये प्रत्येक २० किमीवर लोकांच्या स्वास्थ्यासाठी वेलनेस सेंटर /योग्य निसर्गोपचार केंद्रे हवीत.
– योग्य, निसर्गोपचार, आयुर्वेद हि आपली भारतीय चिकित्सापद्धती आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चिकित्सापद्धती सुद्धा स्वदेशी हवी. हि पद्धती अहिंसक, दुष्परिणाम रहित, नैसर्गिक व सर्वाना परवडण्यासारखी आहे. निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्ग हवाच. मोकळी जागा व वृक्षवेलींनी युक्त असल्यामुळे स्थानिक प्राणवायू पुरवठा व वातावरण शुद्धीसाठी सहायक होईल. गोपालन व निसर्गसंवर्धन सहजच होईल. सेंद्रिय अन्नधान्याविषयी जागरूकता होईल.
नैसर्गिक जन्म व मृत्यू सहजच घडेल.
ज्यांच्याजवळ जागा व इच्छाशक्ती असेल त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व साहाय्य मिळेल.

सांस्कृतिक कार्यक्रम

दर महिन्याला – आनंद घ्या आणि आमच्या संस्कृती समजून घ्या – शारीरिक मानसिक आणि सामाजिक कल्याणात मोलाची भर – ताण कमी करा आणि समर्थन प्रणाली सुधारित करा – दरमहा अनन्य खास मनोरंजन आणि आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह उत्सव आणि अग्निहोत्र .

गुड बाय डॉक्टर

गुड बाय डॉक्टर हा एक आठवड्याचा आरोग्य, निसर्ग व स्वास्र्थसंपन्न जीवनशैलीचा कोर्स आपल्या सोयीने, आपल्या घराजवळ नियोजित करता येतो. स्वस्थ भारत मिशनचा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे. आपला सहभाग स्वागतार्ह आहे. आपल्या कुटुंबासाठी, सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये दोन व्यक्तीपासून कितीही लोकांसाठी आयोजन करू शकता.

स्वास्थ रक्षक

योग निसर्गोपचार कोर्स :
स्वस्थ भारतसाठी प्रत्येक कुटुंब स्वस्थ हवे. कुटुंबाचे स्वास्थ रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एकतरी ʻस्वास्थ रक्षकʼ हवा. जो आपल्या कुटुंबाच्या स्वास्थाची काळजी घेईल, त्यासाठी त्याला शरीरविज्ञान, आहार, निसर्गोपचार व योगशास्त्राचे ज्ञान हवे.

 • १ वर्ष पार्ट टाईम कोर्स
 • कुटूंबातील एकाने तरी करावाच
 • वयाची अट नाही
 • शासन मान्यता – महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रातर्फे
 • अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध
 • डॉक्टर, औषधे, खर्च यापासून सुटका
 • भरपूर प्रॅक्टिकलची सोय

अनुभव कथन

 • स्वास्थ्य रक्षणासाठी.. “निसर्गोपचार”आपले तन आणि मन हे निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी वयाच्या ५० वर्षानंतर प्रत्येकाने ” निसर्गोपचार शिबिर” करणे आवश्यक आहे.मी पत्नीसह जून २०१७ मध्ये डॉ. पुंडे, यांचे मार्गदर्शनाखाली, ग्रीन हील निसर्गोपचार केंद्र, शिरवळ,इथे शिबिर केले. माझ्या सूचनेनुसार माझे मित्र श्री. विठ्ठल जगताप यांनी सुद्धा पत्नीसह १७ ते २२ नोव्हेंबर २०२० दरम्यान तेच निसर्गोपचार शिबिर पूर्ण केले. आम्हाला खूपच उपयोग झाला. दैनंदिन दिनचर्येत अमुलाग्र बदल झाला. माझी तर मधुमेहाची गोळी पूर्ण बंद झाली. B. P. एकदम नॉर्मल आहे. वजन कमी झाले. मान, कंबर , मनके व सांधे दुखी कमी झाली. संपूर्ण अंतर्बाह्य शरीर शुद्धी झाली. मन आणि शरीर तंदुरुस्त झाले. संपूर्ण लाईफ स्टाईल च बदलून गेली. त्या शिबिरामध्ये पुंडे मॅडम यांनी आहार, विहार, आचार आणि विचार याबाबत सांगितलेली तत्वे मी आजही पाळीत आहे. तसेच त्यांनी सांगितले नुसार प्राणायाम, योगसाधना, ई. गेले तीन वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. त्यामुळेच निरोगी व सुखी जीवन व्यतीत करीत आहे.श्री. विठ्ठल जगताप यांना फ्रोजन शोल्डर ्चा त्रास होता. तो पूर्ण कमी झाला. तसेच रात्रीची झोप गेले एक वर्षापासून येतच नव्हती. पाठीवर झोपणे शक्यच नव्हते. खुर्चीवर बसून थोडीफार झोप येत असे. पण निसर्गोपचार शिबिर केल्यानंतर शांतपणे पाठीवर पडून झोप येत आहे. त्यामुळे सर्व मित्र व सहकारी यांना माझी विनंती आहे, की त्यांनी आपणास योग्य असेल अशा ठिकाणी निसर्गोपचार ( Naturopathy treatment) कार्यक्रम जरूर पूर्ण करावा. निसर्गोपचार शिबिर साठी योग्य ठिकाण..
 • वयक्तिक मार्गदर्शन.माफक शुल्क. नैसर्गिक वातावरण.राहण्यासाठी स्वतंत्र कॉटेज.कालावधी फक्त सहा दिवस.अनेक असाध्य आजारांवर उपचार व मार्गदर्शन केले जाते.”नंतर ने अंतर वाढते.”त्वरित निर्णय घ्या. कळलेच नाही , वर्षेचे वर्षे निघून गेली,म्हणून म्हणतो अजूनही वेळ आहे ..थोडं तरी जगून घ्या.. सुंदर अशा जगण्याला डोळे भरुन बघून घ्या…निसर्गोपचार ला जाऊन या…जिंदगी ना मिलेगी दोबारा “शांत मन व निरोगी तन याची गुरुकिल्ली म्हणजेच निसर्गोपचार….” रविंद्र घाडगे, पुणे