योग निसर्गोपचार प्रशिक्षण

निसर्गौपचार ही शारीरिक ,मानसिक, अध्यात्मिक,नैतिक ,सामाजिक स्तरावर व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धति आहे.
योग ही जीवन जगण्याची कला व शास्त्र आहे

आरोग्य शिबीर

स्वस्थ भारतासाठी स्वस्थ कुटुंब हवे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती रोगमुक्त हवी. रोगमुक्ती कायमची व औषधाशिवाय हवी त्यासाठी निसर्गसान्निध्य, तणावमुक्तता, योग्य पोषक व स्वादिष्ट आहार आणि पंचमहाभौतिक उपचार हवेत. हे सगळेच उपचार आरामदायी, निश्चित विकार मुक्ती करणारे, दुष्परिणाम रहित, अहिंसक आहेत. तुमच्याकडून मात्र वेळ, सातत्य व माफक मूल्य खर्च करण्याची अपेक्षा आहे. खूप वर्षांचा आजार फक्त ५-६ दिवसात बरा होणार नाही. पण बरे होण्याची प्रक्रिया नक्की सुरु होते. पुढे आपल्याला सातत्याने वर्षातून दोन-तीन शिबिरे तरी करावी लागतील, पण रोगमुक्ती कायमची व
औषधांशिवाय होईल याची खात्री बाळगावी ही आरोग्य शिबिरे करून अनेकांनी आपली बीपी, डायबिटीस, संधिवात आदी व्याधिमुक्ती करून घेतली आहे.

रोगप्रतिरोधक शिबीर

(प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शनिवारी-रविवारी निवासी) उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला - कोरोनामुळे रोगप्रतिकार शक्तीचे महत्व जाणले. - रोगप्रतिकार शरीराने नैसर्गिकपणे करायला हवा. - बाह्य उपचाराने व्हॅक्सीन, गोळ्या, औषधे यांनी तत्कालीन होतो.
- निसर्गाशी संतुलन = आरोग्य
-निसर्गाशी असंतुलन = अनारोग्य
- निसर्गसान्निध्यात शनिवार रविवार
- शरीर शुद्धीकरण
- रोगप्रतिकारशक्तीची वाढ
-पोषक आहार
- आराम व तणावमुक्ती
यांचा अनुभव घ्यावा

योग निसर्गोपचार केंद्र मार्गदर्शन

- देशभरामध्ये प्रत्येक २० किमीवर लोकांच्या स्वास्थ्यासाठी वेलनेस सेंटर /योग निसर्गोपचार केंद्रे हवीत.
- योग, निसर्गोपचार, आयुर्वेद हि आपली भारतीय चिकित्सापद्धती आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चिकित्सापद्धती सुद्धा स्वदेशी हवी. हि पद्धती अहिंसक, दुष्परिणाम रहित, नैसर्गिक व सर्वाना परवडण्यासारखी आहे. निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्ग हवाच. मोकळी जागा व वृक्षवेलींनी युक्त असल्यामुळे स्थानिक प्राणवायू पुरवठा वातावरण शुद्धीसाठी सहायक होईल. गोपालन व निसर्गसंवर्धन सहजच होईल. सेंद्रिय अन्नधान्याविषयी जागरूकता होईल.
नैसर्गिक जन्म व मृत्यू सहजच घडेल.
ज्यांच्याजवळ जागा व इच्छाशक्ती असेल त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व साहाय्य मिळेल.

सांस्कृतिक कार्यक्रम

भारतीय संस्कृती शास्त्रशुद्ध विज्ञानाधिष्ठित म्हणून आधुनिक व एकात्म मानवतावादी आहे.
मानवी स्वभावाचा विचार करून आचारण्यास सुलभ , आनंददायी व सर्वसमावेशक आहे.
आपले सण , व्रते , उत्सव , कुंधर्म सारे मनामनात रुजलेले आहेत.
पण आधुनिक जीवनशैली , विभक्त कुटुंबे , वेळेच्या अभाव नियोजनांच्यामुळे काहीशी विस्मृत होत असलेली.
सांस्कृतिक कुटुंबभावनेने एकत्रित पुढच्या पिढीला पोहोचण्यासाठी ग्रीनहिल येथे कार्यक्रम होत राहतात.
ज्यामुळे सणांचे महत्व ऋतूनुसार खानपानांची शास्त्रशुद्धता विविध कलेचा प्रसार व पेहराव इ. वर भर दिला जातो.

गुड बाय डॉक्टर

गुड बाय डॉक्टर हा एक आठवड्याचा आरोग्य, निसर्ग व स्वास्र्थसंपन्न जीवनशैलीचा कोर्स आपल्या सोयीने, आपल्या घराजवळ नियोजित करता येतो. स्वस्थ भारत मिशनचा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे. आपला सहभाग स्वागत आहे. आपल्या कुटुंबासाठी, सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये दोन व्यक्तीपासून कितीही लोकांसाठी आयोजन करू शकता.

Subscribe Us



Nirogi Jivanshaili || निरोगी जीवनशैली

Swastha Bharat Mission

Request a Consultation

If you have any questions or just want to get in touch, use the form below. we look forward to hearing from you!